मुंबई, 1 फेब्रुवारी 2022: जीडीपी वाढीबाबत आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजांमुळं सोमवारी शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण होतं. BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स निर्देशांक 813.94 अंकांनी म्हणजेच 1.42% ने वाढून 58,014.17 वर बंद झाला. दुसरीकडं, NSE निफ्टी देखील 237.80 अंक म्हणजेच 1.39% ने वाढवून 17,339.80 वर बंद झाला. निफ्टीमध्ये टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, विप्रो, बीपीसीएल आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्स सर्वाधिक वाढले. दुसरीकडं, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, यूपीएल, कोल इंडिया आणि एचयूएलला सर्वाधिक घसरण झाली.
जाणून घ्या कोणत्या सेक्टरचं काय झालं
ऑटो, फार्मा, आयटी, ऑइल आणि गॅस, पीएसयू बँका आणि रिअल इस्टेटमध्ये 1-3 टक्क्यांनी वाढ झाली. दुसरीकडं बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप 1-1.7 टक्क्यांनी वाढले.
सेन्सेक्सवर या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
BSE सेन्सेक्सवर, टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.88% वाढ झाली. त्याचप्रमाणं विप्रोचे शेअर्स 3.70 टक्क्यांनी वाढून बंद झाले. याशिवाय Bajaj Finserv, इन्फोसिस (Infosys), एसबीआय (SBI), पावरग्रिड (Powergrid), Reliance Industries, Dr Reddy’s, Titan, Bajaj Finance, Bharti Airtel, M&M, HCL Tech, अल्ट्राटेक सीमेंट (Ultratech Cement), एचडीएफसी बँक (HDFC Bank), एशियन पेंट्स, एनटीपीसी (NTPC), टीसीएस (TCS), आईटीसी (ITC) यांचे शेअर्स हिरव्या चिन्हासह बंद झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे