मुंबई: सध्या धोक्यात असलेल्या काँग्रेसने साडेनऊ वाजता आपल्या नेत्यांना मुंबईमध्ये भेटायला बोलावलेला आहे. साडेनऊ वाजता काँग्रेसची बैठक होणार. काँग्रेसचे दिल्लीचे नेते सुद्धा मुंबईत अजूनही उपस्थित आहेत. ते म्हणतात आहेत की हे जे काही घडलं ते बिलकुल अपेक्षित नव्हतं मात्र दुसरीकडे काही ज्येष्ठ नेत्यांची बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं असं सुद्धा आहे की, कुठेतरी याचे संकेत मिळत होते. अजून कुठेही काँग्रेसचा संपर्क शरद पवारांची झालेला नाहीये मात्र कुठेतरी हा संकेत मिळत होते. पवारच म्हणत होते की एवढी घाई करू नका सर्व निर्णय घेऊया आणि त्यामुळे काय थांबायचं कशासाठी थांबायचं होतं याचे कारण आता समजले आहे.
तर दुसरीकडे असेही सांगितले जात आहे की शिवसेनेचे सतरा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. परंतु तूर्तास हे नेते मंडळी कोण आहेत त्यांची नावे सांगण्यास भाजपने नकार दिला आहे व काही काळाने हे सांगू असे म्हणून त्यांनी बोलणे टाळले आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांकडून असे म्हटले जात आहे की शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय अजित पवारांनी असे केले नाही कुठे ना कुठे शरद पवार यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.