मी जन्मभर शरद पवारांसोबत असेल: जितेंद्र आव्हाड

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे.
अजित पवारांचा एक गट फुटला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर मी जन्मभर शरद पवारांसोबत असेल. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांसोबत राहिल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
अजित पवार यांना ३० आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती समजतेय. मात्र आमचे कुठलेही आमदार फुटले नाहीत, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण सेंटरला नेमकं काय झालं आणि कसं झालं, हे एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटरला राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना बोलावून घेतलं आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा