Xiaomi 12 Pro भारतात होणार लॉन्च, 120W चार्जिंगसह तीन 50MP कॅमेरा, जाणून घ्या फीचर्स

पुणे, 4 एप्रिल 2022: Xiaomi आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये Xiaomi 12 Pro लॉन्च केला होता. आता कंपनी हा फोन भारतात लॉन्च करू शकते. या फोनला Xiaomi इंडियाचे महाव्यवस्थापक मनु कुमार जैन यांनी टीज केलं आहे. ब्रँडने या स्मार्टफोनच्या लॉन्च डेटाची घोषणा केलेली नाही, परंतु मनु कुमार यांचं ट्विट नक्कीच काही संकेत दर्शवते.

हा स्मार्टफोन आधीच जागतिक बाजारपेठेत आणि चीनमध्ये लॉन्च करण्यात आलाय. मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, ‘काळच सांगेल’. त्यांच्या या फोटोमध्ये एक कॅलेंडर आहे, ज्यावर 12 एप्रिलची तारीख आहे. भिंतीवर एक घड्याळ टांगलं आहे, ज्यामध्ये 12 वाजले आहेत.

जर आपण हे संकेत एका क्रमानं जोडले तर Xiaomi 12 Pro स्मार्टफोन 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनी या फोनसोबत इतर कोणते डिव्हाईस लॉन्च करणार आहे याची माहिती सध्यातरी मिळालेली नाही.

Xiaomi 12 Pro मध्ये काय खास असंल

कंपनीने गेल्या महिन्यात हा फोन जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 6.73-इंचाची WQHD + AMOLED स्क्रीन आहे, जी 1500 nits च्या पीक ब्राइटनेससह येते. डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेट सपोर्टसह, 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेट आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह येतो. यात LTOP बॅकप्लेन तंत्रज्ञान आहे, जे Apple iPhone मध्ये वापरले जातं.

Xiaomi 12 Pro मध्ये कंपनीने Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर दिला आहे, जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह येतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय, ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. याशिवाय, 50MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 50MP टेलिफोटो सेन्सर उपलब्ध आहेत. फ्रंटमध्ये कंपनीने 32MP सेल्फी कॅमेरा दिलाय.

कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर Xiaomi 12 Pro मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, NFC, IR ब्लास्टर आणि USB टाइप-C पोर्ट सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. फोनमध्ये 4600mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग फीचर्स देखील देते. हा स्मार्टफोन Android वर आधारित MIUI 13 वर काम करतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा