नाही चालली एमएस धोनीची बॅट , पंजाब किंग्सने चेन्नईचा केला 11 धावांनी पराभव

CSK vs PBKS, 26 एप्रिल 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सोमवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला आहे. पंजाब किंग्जने एका रोमांचक सामन्यात चेन्नईचा 11 धावांनी पराभव केला. CSK ला शेवटच्या षटकात 27 धावांची गरज होती, एमएस धोनी क्रीजवर होता पण तो तिसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि चेन्नईच्या आशा संपल्या.

या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 187 धावा केल्या होत्या, तर पंजाबकडून शिखर धवनने 88 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला केवळ 176 धावा करता आल्या आणि 11 धावांनी सामना गमवावा लागला. चेन्नई सुपर किंग्जचा सहावा पराभव असून आता त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी आहे.

शेवटच्या दोन षटकात हव्या होत्या 35 धावा

चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या 12 चेंडूत 35 धावांची गरज होती आणि एमएस धोनी, रवींद्र जडेजा क्रीजवर होते. अर्शदीप सिंगने या षटकात केवळ 8 धावा दिल्या, ज्यात एमएस धोनीने लगावलेला चौकार समाविष्ट होता. अशा स्थितीत चेन्नईला शेवटच्या षटकात 27 धावांची गरज होती आणि पंजाबसाठी ऋषी धवनला गोलंदाजीसाठी आणले, ज्याने शानदार गोलंदाजी करत संघाला सामना जिंकून दिला.

19.1 षटके – 6 धावा (एमएस धोनी)
19.2 ओव्हर-वाइड
19.2 षटके – 0 धावा
19.3 षटके – एमएस धोनी बाद
19.4 षटके – 1 धाव
19.5 षटके – 6 धावा
19.6 षटके – 1 धाव

चेन्नई सुपर किंग्ज डाव (176/6, 20 षटके)

पहिली विकेट – रॉबिन उथप्पा, 1 धाव (10/1)
दुसरी विकेट – मिचेल सँटनर 9 धावा, (30/2)
तिसरी विकेट – शिवम दुबे 8 धावा (40/3)
चौथी विकेट- ऋतुराज गायकवाड 30 धावा (89/4)
पाचवी विकेट – अंबाती रायडू 78 धावा (153/5)
6वी विकेट – एमएस धोनी 12 धावा (168/6)

पंजाब किंग्ज डाव- (187/4, 20 षटके)

या सामन्यात पंजाब किंग्जने जबरदस्त फलंदाजी केली आणि संघाचा ‘गब्बर’ शिखर धवनने चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांवर कहर केला. शिखर धवनने आपल्या डावात 88 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 59 चेंडूत 2 षटकार, 9 चौकार लगावले.

पंजाबची सुरुवात संथ झाली आणि कर्णधार मयंक अग्रवाल (18 धावा)ही लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण यानंतर धवन आणि भानुका राजपक्षे यांच्यात 71 चेंडूत 110 धावांची भागीदारी झाली.

भानुकाने आपल्या डावात 32 चेंडूत 42 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने अवघ्या 7 चेंडूत 19 धावा केल्या आणि अखेरच्या सामन्यात संघाला झटपट धावा मिळवून दिल्या.

पहिली विकेट – मयंक अग्रवाल, 18 धावा (37/1)
दुसरी विकेट – भानुका राजपक्षे, 42 धावा (147/2)
तिसरी विकेट – लिव्हिंग लाइमस्टोन, 19 धावा (174/3)

पंजाब किंग्ज प्लेइंग-11: मयंक अग्रवाल, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग-11: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महिश तिक्षन

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा