Chandrayaan-3, 28 एप्रिल 2022: कोविड-19 महामारीमुळे चंद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेला विलंब होत होता. या मोहिमेची पहिली छायाचित्रं अखेर इस्रोने ने जाहीर केले आहे. इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने ‘स्पेस ऑन व्हील्स’ (Space on Wheels) या डॉक्यूमेंट्री मध्ये हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. भारताने लॉन्च केलेले 75 सॅटॅलाइट ही या डॉक्युमेंट्री मध्ये दाखवण्यात आले आहेत.
चंद्रयान-3 ऑगस्टमध्ये होणार लॉन्च
चंद्रयान-3 लँडर चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करताना कसा दिसतो ते व्हिडिओमध्ये दाखवलंय. 2019 मध्ये चंद्राजवळ क्रॅश झालेल्या चंद्रयान-2 नंतर हे मिशन तयार करण्यात आलंय. पृष्ठभागापासून सुमारे 350 मीटर उंचीवरून वेगाने फिरत असताना ते जमिनीवर आदळलं होतं.
इस्रोचं म्हणणं आहे की, ते या वर्षी ऑगस्टपर्यंत हे मिशन सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. तथापि, याक्षणी हे कठीण दिसते आहे, कारण अनेक हार्डवेअर टेस्ट बाकी आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, अंतराळ विभागाने एका लेखी उत्तरात सांगितलं की चंद्रयान-3 वर काम सुरू आहे आणि ते यावर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केलं जाईल.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, कोविड-19 मुळं हे अभियान लांबलं आहे. याशिवाय सुरू असलेल्या इतर अनेक मोहिमांवर परिणाम झालाय.
17 मिनिटांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये इतर मोहिमांबद्दलही सांगितलं
चंद्रयान-3 व्यतिरिक्त, या 17 मिनिटांच्या माहितीपटात देशाच्या आगामी आदित्य एल1 मिशन आणि गगनयान मिशनबद्दल सांगण्यात आलंय जे भारतीय अंतराळवीरांना अंतराळात सोडणार आहेत.
आदित्य L1 मिशन पृथ्वी-सूर्य प्रणालीच्या पहिल्या लॅग्रेंज पॉइंटमध्ये ठेवले जाईल, ते सूर्याच्या अनेक गुणधर्मांचा शोध घेईल, जसं की कोरोनल मास इजेक्शनची गतिशीलता आणि उत्पत्ती. चंद्र आणि सौर मोहिमांचा मागोवा घेण्यासाठी एक नेटवर्क तयार करण्यासाठी भारत आधीच युरोपियन स्पेस एजन्सीसोबत काम करत आहे.
ESA म्हणते की त्याचे ग्लोबल डीप स्पेस कम्युनिकेशन अँटेना दोन्ही मोहिमांसाठी सर्व शक्य मदत करतील. ते अंतराळयानावर लक्ष ठेवतील, महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचं स्थान पिन पॉइंट करतील, तसंच कमांडही देतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे