OnePlus 10R भारतात लॉन्च, अवघ्या 10 मिनिटांत होईल फोन चार्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

21

OnePlus 10R lounch, 30 एप्रिल 2022: OnePlus ने आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 10R भारतीय बाजारात लॉन्च केलाय. हा फोन मजबूत कॅमेरा, प्रोसेसर आणि बॅटरीसह येतो. वास्तविक, कंपनीने याला आधीच OnePlus Ace नावाने चिनी मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. या फोनमध्ये तुम्हाला 50MP मेन लेन्स मिळेल.

OnePlus चा नवीनतम फोन MediaTek Dimensity 8100 MAX प्रोसेसरसह येतो. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज पर्याय आहे. हँडसेटचे मेन फीचर म्हणजे त्याची चार्जिंग कॅपॅसिटी. डिव्हाइसला 4500mAh बॅटरीचा सपोर्ट आहे, जो 150W चार्जिंग सपोर्टसह येतो. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि इतर खास फीचर्स.

OnePlus 10R ची किंमत

OnePlus ने आपला नवीनतम फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केलाय. फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 38,999 रुपये आहे. त्याच वेळी, त्याचा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 42,999 रुपयांमध्ये येतो. 12GB रॅम + 256GB स्टोरेज असलेल्या फोनच्या Sierra ब्लॅक कलर व्हेरिएंटची किंमत 43,999 रुपये आहे.

हा व्हेरिएंट 4500mAh बॅटरी आणि 150W चार्जिंगसह येतो, तर सुरुवातीच्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये 5000mAh बॅटरी आणि 80W चार्जिंग मिळते. फोनची पहिली विक्री 4 मे रोजी होणार आहे. तुम्ही 4 मे रोजी दुपारी 12 वाजता Amazon आणि OnePlus च्या अधिकृत वेबसाइटवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकाल.

काय आहेत OnePlus 10R ची फीचर्स?

ड्युअल सिम सपोर्टसह OnePlus 10R Android 12 वर आधारित Oxygen OS वर काम करतो. यात 6.7-इंच फुल एचडी+ रिझोल्यूशन AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कंपनीने गोरिला ग्लास 5 दिला आहे.

यात Octacore MediaTek Dimensity 8100 MAX प्रोसेसर आहे, जो 12GB पर्यंत RAM सह येतो. डिव्हाइसमध्ये 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे.

याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स उपलब्ध आहेत. समोर, OnePlus ने 16MP सेल्फी कॅमेरा दिलाय. कनेक्टिव्हिटी फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, OnePlus 10R मध्ये 5G, 4G LTE, WiFi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्ट आहे.

फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. स्मार्टफोनमध्ये 4500mAh/5000mAh बॅटरी आहे, जी 150W आणि 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याच वेळी, फोनमध्ये वायरलेस चार्जिंग दिलेले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा