नवी दिल्ली: इस्रोने ‘कार्टोसैट-३’ या सॅटेलाइटचे लाँचिंग २५ नोव्हेंबरऐवजी आता २७ नोव्हेंबर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे सॅटेलाइट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून अंतराळात झेपावणार आहे. ‘कार्टोसैट-३’ सोबतच अमेरिकेचे १३ व्यावसायिक छोटे उपग्रहही यावेळी अंतराळात सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.
भारतीय सैन्यदलाची ताकद वाढविण्यासाठी इस्रो कार्टोसैट-३ हे सॅटेलाइट लाँच करणार आहे. डिसेंबर महिन्यात इस्रो आणखी दोन सर्व्हिलान्स सॅटेलाइटस् रिसॅट-२ बीआर १ आणि रिसॅट-२ बीआर २ अंतराळात पाठविणार आहेत.
कार्टेसैट सीरिजचे आतापर्यंत ८ सॅटेलाइट लाँच करण्यात आले असून कार्टोसैट-१ चे लाँचिंग ५ मे २००५ रोजी झाले होते.
कार्टोसैट-३ ची वैशिष्ट्ये
*सूक्ष्म कॅमेरा, जमिनीवरील एक फुटावरील कमी उंचीवरील हालचालीही अचूक टिपणार.
* विविध प्रकारच्या हवामानात पृथ्वीची छायाचित्रे घेण्यात सक्षम.
*जगातील सर्वात शक्तिशाली कॅमेरा; कोणत्याही देशाने इतका शक्तिशाली कॅमेरा लाँच केलेला नाही.
* कार्टोसैट-3 ला पृथ्वीपासून 450 किलोमीटर इतक्या उंचीवर स्थापन करण्यात येणार.