मुंबई इंडियन्सचा दुसरा विजय, गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव

GT vs MI, 7 मे 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने शुक्रवारी गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव केला. 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावाच करू शकला. गुजरातचा 11 सामन्यांतील हा तिसरा पराभव ठरला.

गुजरात टायटन्सचा डाव (172/5)

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी 12.1 षटकात 106 धावांची भागीदारी केली. रिद्धिमान साहाने 40 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 55 धावा केल्या. दुसरीकडे शुभमन गिलने 36 चेंडूत 52 धावा केल्या. गिलच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकारांचाही समावेश होता.गुजरातला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती, मात्र डॅनियल सॅम्सने शानदार गोलंदाजी करत मुंबईला जिवंत केले.

पहिली विकेट – शुभमन गिल 52 धावा (106/1)
दुसरी विकेट – रिद्धिमान साहा 55 धावा (111/2)
तिसरी विकेट- साई सुदर्शन 14 धावा (138/3)
चौथी विकेट – हार्दिक पंड्या 24 धावा (156/4)
पाचवी विकेट – राहुल तेवतिया 3 धावा, (171/5)

मुंबई इंडियन्सचा डाव (177/6)

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 7.3 षटकांत 74 धावा जोडून मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार रोहित शर्माने 28 चेंडूत 43 धावा केल्या, तर इशान किशननेही 29 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 45 धावांचे योगदान दिले.

टीम डेव्हिडनेही शेवटच्या षटकात 21 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या, त्यामुळे मुंबई इंडियन्सला चांगली धावसंख्या गाठता आली. टीम डेव्हिडच्या खेळीत 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने सर्वाधिक दोन खेळाडूंना बाद केले.

पहिली विकेट – रोहित शर्मा 43 धावा (77/1)
दुसरी विकेट- सूर्यकुमार यादव 13 धावा (99/2)
तिसरी विकेट- इशान किशन 45 धावा (111/3)
चौथी विकेट- किरॉन पोलार्ड 4 धावा (119/4)
पाचवी विकेट- टिळक वर्मा 21 धावा (156/5)
सहावी विकेट – डॅनियल सॅम्युअल 0 धावा (164/6)

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (क), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (क), टिम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, कुमार कार्तिकेय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा