बाप रे बाप कचऱ्याचा ताप

भारतात दररोज जमा होतो
तब्बल 25 हजार टन कचरा

नवी दिल्ली: भारतामध्ये दररोज सुमारे २५ हजार टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचा कचरा जमा होत आहे. दररोज ४० टक्के कचरा शहरातील अनेक ठिकाणी पडलेला असतो. तो जमाच केला जात नाही. या कचऱ्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

उत्पादनांचा वापर वाढल्यामुळे प्लास्टिकची मागणी होत आहे. यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी पुढाकार घेऊन काही निर्णय घेण्यास सुरवात केली आहे.

पर्यावरण मंडळाच्या सर्वेक्षणानुसार, देशात मुख्य ६० शहरात दररोज ४हजार ५९टन कचरा निर्माण होतो. तसेच भारतात ४ हजार ७७३ नोंदणीकृत प्लास्टिक पुनर्प्रक्रिया केंद्र आहेत.त्यात रोज जमा होणाऱ्या कचऱ्याच्या ६० टक्के कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. उर्वरित ४०टक्के कचरा गोळाच केला जात नाही.
त्यामुळे हा गोळा न झालेला कचरा पर्यावरणाच्या हाणीसाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आपल्या सर्वांच्या दृष्टीने गरजेचे आहे. नाही तर ‘बाप रे बाप कचऱ्याचा ताप’असे म्हणण्याची आपल्या सर्वांवर वेळ येईल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा