मध्यप्रदेश : मध्यप्रदेश येथील कनीमुच, इंदूर आणि माळवा भागातील शेतकऱ्यांनी काळया गव्हाचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. काळा गहू पाहून लोक आश्चर्य वाटत असेल. तसेच अनेकांना याबाबत कुतूहल निर्माण झाले असेल. नीमुच जिल्ह्यातील कानखेरी या गावातील प्रगतीशील शेतकरी गोविंद नागदा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तीन बीघा जागेत पेरलेल्या मोहालीतील नबी रिसर्च सेंटर मधील मित्राच्या मदतीने ४० किलो काळ्या गव्हाचे बियाणे घेतले होते.
कापणी व साफ सफाईनंतर या गहूचे वजन केले असता त्याचे वजन ३६ क्विंटल होते. तथापि, उत्पादन साधारण गव्हासारखेच राहिले. सामान्य गहू सरासरी बिघावरही १०-१२ क्विंटल उत्पादन देतो. याबाबत मध्य प्रदेशातील स्थानिक वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.
राष्ट्रीय कृषी-खाद्य जैव तंत्रज्ञान संस्था (एनएबीआय) मोहालीच्या संशोधनानंतर, काळ्या गव्हाला पेटंट देण्यात आले आहे. या गव्हाला ‘नबी एमजी’ असे नाव देण्यात आले असून ते काळा, निळे आणि जांभळ्या रंगात उपलब्ध आहे. सामान्य गव्हापेक्षा बरेच पौष्टिक आहे. शिवाय, काळा गहू तणाव, लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार रोखण्यासाठी उपयुक्त आहे.
अँथोसायनिन हा गव्हामधील महत्वाचा घटक आहे. याचे सामान्य गव्हातील प्रमाण ५ ते १५ पीपीएम इतके असते तर काळ्या गव्हातील प्रमाण अँथोसायनिन याचे प्रमाण ४० ते १४० पीपीएम .अँथोसायनिन मध्ये अँटिकॅन्सर, अँटिडियाबेटिक, अँटीमिक्रोबिल हे औषधी गुणधर्म असतात . अँथोसायनिन चे प्रमाण जास्त असल्याने काळया गव्हाला आरोग्यविषयक गुणधर्म येतात.
फायदे: काळा गहू हा सामान्य गव्हापेक्षा जास्त पौष्टिक आहे. यातील घटक गुणवत्तेच्या दृष्टीने ती ब्लूबेरी नावाच्या फळाइतकीच ठेवली आहेत.याचे पुढीलप्रमाणे फायदे होतात
ताण : आजच्या काळात प्रत्येक माणूस कमी-जास्त प्रमाणात तणावात ग्रस्त आहे. काळा गहू आहारात घेतल्याने फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर ताण तणाव कमी होतो.
लठ्ठपणा: लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासाठी काळ्या गहूचे संशोधनात्मक काम चालू आहे. याचा चांगला फायदा लठठ पणा नियंत्रित करण्यासाठी होतो.
कर्करोग : काळ्या गव्हामध्ये कर्करोगावर नियंत्रण मिळवण्याचे गुणधर्म असल्याने कर्करोग औषध म्हणून वापरले जाईल
मधुमेह: मधुमेहावर औषध गुणधर्म असल्याने काळ्या गव्हाचा वापर मधुमेहवर नियंत्रण मिळवण्यासाठी होतो.