तिरू अनंतपुरम, 2 जून 2022: देशात प्रसिद्ध आणि मोठ्या प्रमाणावर भाविकांकडून भेट दिल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांमध्ये तिरुपती बालाजी एक आहे. कोरोना नंतर धार्मिक स्थळं उघडल्यानंतर भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलीय. दुसरी बाजू म्हणजे भाविक मोठ्या संख्येने भेट देतात तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल देखील होते. तिरू अनंतपुरम मध्ये मात्र भाविकांना आर्थिक व्यवहारात अडचणी होताना दिसत आहे.
प्रकरण असं आहे की तेथील स्थानिक लोक 10 रुपयाचं नाणं घेण्यास नकार देत आहे. यामुळं भाविकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिरू अनंतपुरम वरून येणाऱ्या अनेक भाविकांनी याची तक्रार करण्यास सुरुवात केलीय.
आरबीआय चं म्हणणं काय?
यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितलंय की ₹ 10 च्या सर्व 14 डिझाईन्स व्यवहारांसाठी वैध आणि कायदेशीर निविदा म्हणजेच लीगल टेंडर आहे, काही व्यापाऱ्यांनी नाणी स्वीकारण्यास नाखूष असल्याचं दाखवलं आहे. अफवांमुळं अनेक ठिकाणी 10 रुपयाचं नाणं स्वीकारण्यास नकार देण्याचे प्रकार याआधीही अनेक ठिकाणी घडले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे