अहमदनगर, 15 जून 2022: भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये आणि जिल्हातही खळबळ निर्माण केली आहे. त्यामुळे विखे पिता-पुत्र पुन्हा एकदा जिल्हाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. खासदार विखे यांच्या वक्तव्यातून ते जिल्ह्यात आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आपला स्वतंत्र गट निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट तर होतेच त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे.
दोघांचेही वक्तव्ये ही राजकीयदृष्ट्या मोठी असल्याने त्याला आतून पक्षश्रेष्ठींची संमती तर नाही ना? अशीही खासगीत चर्चा सुरू आहे. शिवसैनिकांशी आपले वैर नाही आपल्या खासदारकीमध्ये त्यांचा 50 टक्के वाटा आहे. त्यामुळे शिवसैनिकांना आपण विसरणार नाही. त्यांची साथ आपण सोडणार नाही अशी भुमिका भाजप खासदार विखे यांनी जाहीर केली आहे.
त्याचवेळी त्यांचे वडील माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी अजित पवार यांनी परत यावे आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणावे अशी साद घातली आहे. विखे पिता-पुत्रांनी एकाच दिवशी दोन स्वतंत्र ठिकाणी केलेल्या या वक्त्यव्याबद्दल चर्चा होऊ लागली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी