इस्रायल, 21 जून 2022: इस्राईलमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट निर्माण झालंय. बेंजामिन नेतन्याहू यांना पंतप्रधानपदावरून हटवून आघाडीचे सरकार चालवणारे नफ्ताली बेनेट यांचे सरकार निश्चित झालंय. 3.5 वर्षांच्या आत, इस्रायलमध्ये पाचव्यांदा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत परराष्ट्रमंत्री यायर लॅपिड काही दिवसांसाठी पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारतील.
सोमवारी, इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं. दोघांनी आपापल्या पक्षांमध्ये सुरू असलेली युती तोडण्याबाबत चर्चा केली. संयुक्त निवेदनात म्हटलंय की बेनेट आणि लॅपिड नेसेट (इस्त्रायली संसद) विसर्जित करण्यासाठी विधेयक आणतील. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा निवडणुका होऊ शकतात.
युतीदरम्यान झालेल्या करारानुसार, निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत लॅपिड हे काळजीवाहू पंतप्रधान राहतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पुढील महिन्यात इस्राईलला भेट देणार आहेत. अशा स्थितीत आता बायडेन यांचं स्वागत बेनेट नव्हे तर लॅपिड करणार आहे.
नफताली बेनेट हे इस्राईलच्या उजव्या विचारसरणीच्या यामिना पक्षाचे प्रमुख आहेत. ते 2019 मध्ये तयार करण्यात आले होते. यायर लॅपिड he यश अतीद नावाच्या लिबरल पक्षाचे नेते आहेत. लॅपिड यांनी 2012 मध्ये पक्ष स्थापन केला होता.
अरब पक्ष सरकारवर नाराज होता
टाईम्स ऑफ इस्राईलच्या अहवालानुसार, नफताली बेनेट यांच्या सरकारकडं विरोधी पक्षांपेक्षा फक्त 1 जागा जास्त होती. माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देखील दीर्घकाळापासून सरकारमध्ये सहभागी असलेल्या खासदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. किंबहुना बेनेट सरकारमध्ये सहभागी असलेला एक अरब पक्ष सरकारच्या कामावर नाराज होता. पॅलेस्टाईनच्या वसाहतींमध्ये ज्यू नागरिकांचे पुनर्वसन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे