नवी दिल्ली, 5 जुलै 2022: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी चिनी कंपनी विवोवर छापा टाकला. यूपी, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पंजाब आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये 44 ठिकाणी संबंधित कंपन्यांची झडती घेण्यात आली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हा छापा टाकण्यात येत आहे. सकाळपासून ईडीच्या अनेक पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.
चीनच्या मोबाईल कंपन्या IT आणि EDच्या निशाण्यावर
इतर चिनी कंपन्यांप्रमाणे विवो देखील आयटी आणि ईडीच्या रडारवर आहे. एप्रिलमध्ये, विवोच्या मालकी आणि आर्थिक अहवालांमध्ये तफावत आहे का हे पाहण्यासाठी चौकशी करण्यात आली होती. ईडी, सीबीआय सोबतच कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयही या कंपन्यांशी संबंधित कंपन्यांवर बारीक नजर ठेवून आहे.
Xiaomi वरही करण्यात आली होती कारवाई
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi वर ईडीने छापा टाकला होता. एप्रिलमध्ये ईडीने त्यांच्या बंगळुरू कार्यालयातून 5,551 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. कंपनीने आपली कमाई बेकायदेशीरपणे भारताबाहेर पाठवल्याचा आरोप होता. कंपनीने हा फेरफार या महिन्यात फेब्रुवारीमध्ये केला होता, त्यानंतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली होती. ईडीने म्हटलंय की टेक कंपनी चीनमधील मूळ कंपनीच्या सांगण्यावरून रॉयल्टीच्या नावावर एवढ्या मोठ्या रकमेचा गैरवापर करत आहे. अमेरिकेत उपस्थित असलेल्या Xiaomi ग्रुप कंपनीलाही ते पाठवण्यात आले.
Huawei वरही टाकण्यात आला छापा
प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारीमध्ये Huawei च्या कार्यालयांवरही छापे टाकले होते. तपास यंत्रणेची ही झडती दिल्ली, हरियाणा, गुरुग्राम आणि बंगळुरू येथील कार्यालयात घेण्यात आली. करचोरी प्रकरणातील काही कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. Huawei ने एका निवेदनात म्हटलं होतं की, आम्ही भारतात कंपनी चालवण्यासाठी प्रत्येक नियमाचे पालन करत आहोत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे