11 जुलै, 2022: अखेर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पावसाने हजेरी लावली आहे. मात्र आता पावसाचा जोर वाढत असून त्यामुळं नुकसान आणि जिवीत हानी वाढली आहे.नाशिक येथे गोदावरी नदीच्या पात्रातलं पाणी वाढून तेथे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहें. तेथील नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.ठाणे, पालघर, डहाणू येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान खात्याने पुढचे पाच दिवस ठाणे जिल्ह्याला रेड ॲलर्ट दिलाय.कोकणात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, येथे पावसाचा हाहाकार सुरु असून तेथील स्थिती बिकट आहे.
महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकात पावसाचा जोर वाढला असून बेळगांव आणि तेलगंणात पावसाने सर्व सामांन्य जीवन अस्ताव्यस्त झालंय.गुजरातमध्ये अहमदाबाद, कच्छ, द्वारका येथे पावसाचा जोर वाढला असून तेथे हवामान खात्याने ॲारेंज अलर्ट जारा केलाय.जुलै मध्ये महिनाभर पाऊस सुरु राहणार असून धरणे भरण्यास आणि शेती करण्यासाठी उत्तम पाऊस असल्याने शेतकरी मात्र आनंदला आहे. पण सर्वसामांन्यांचे मात्र हाल होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिंधी – तृप्ती पारसनीस