भाजपा अजून एका धक्कातंत्राच्या तयारीत, शिवसेनेच्या बंडखोर नेत्याला थेट उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी?

नवी दिल्ली, १६ जुलै २०२२: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळेच आता भाजपने आपला मोर्चा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे वळवल्याचं चित्र दिसत आहे.

आज संध्याकाळी पाच वाजता दिल्लीमध्ये होणार्‍या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे संभाव्य उमेदवाराच्या यादीमध्ये एक मराठी नावाचाही समावेश आहे.

देशाच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ६ आँगस्टला होणार आहे. लोकसभा व राज्यसभेच्या एकून ७८८ खासदारांमधुन उपराष्ट्रपतींची निवड होती. राष्ट्रपतीपदाची निवडणूक स्वबळावर जिंकण्याऐवढी भाजपकडे मते नसल्याने प्रादेशिक पक्षांची मदत घेण्यात येत आहे,

पण उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळेच आजच्या संसदीय समितिच्या बैठकीमध्ये भाजपा उपराष्ट्रपतीपदाचे नाव निश्चित करणार असल्याचे मानले जात आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या यादीमध्ये काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिलेल्या माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच नाव आघाडीवर आहे. मात्र त्याचप्रमाणे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाची चर्चा उपराष्ट्रपती पदासाठी केली जात असल्याचे समजते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा