टोल नाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, रुग्णासह चौघांचा मृत्यु; धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद

Karnataka Ambulance Crash, २१ जुलै २०२२: कर्नाटकमधील उटप्पी जिल्हामधील शिरुर येथे एका रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला असून हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बुधवारी (२० जुलै ) झालेल्या या अपघातामध्ये रुग्णवाहिका टोल नाक्यावरील गेटला धडकून रस्त्याच्या बाजूला पडल्याची सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.

या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यु झाल्याची माहीती स्थानिक पोलिसानी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनूसार हुन्नवर ते कुंदापूर असा प्रवास करत असणऱ्या या रुग्णवाहिकेमध्ये एक रुगण आणि दोन कर्मचारी होते. या तिघांचाही अपघातामध्ये मृत्यु झाला आहे.

तसेच टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्याचाही या अपघातात मृत्यु झाला असून चालक गंभीर जखमी असल्याचे पोलीसांनी सांगितलं आहे. अपघाताच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पावसामुळे ओल्या झालेल्या रस्त्यावरुन गाडी सरकल्यांचं दिसत आहे. रुग्णवाहिका येत असल्याचं पाहून टोल नाक्यावरील कर्मचारी रुग्णवाहिकेसाठी राखीव असणाऱ्या लेनवर टेवण्यात आलेलं प्लास्टिकचं बॅरिकेट काढण्यासाठी जात असल्याचे दिसत आहे.

तितक्यात एका नाजूक वळनावरुन टोल नाक्याच्या दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकेसमोर एक गाय रस्त्यात बसलेली होती. मात्र ही गाय लेनवरच असल्याने तिला वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेचा चालक जोरात ब्रेक दाबतो.

या अपघातामध्ये रुग्णवाहिकेतील रुग्णही गाडीबाहेर फेकला गल्याचं दिसत आहे. तर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यालाही रुग्णवाहिकेची धडक बसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे वाहनचालकांनी देखील ओल्या रस्तावर सावकाश वाहन चालवणं आवश्यक असल्याचं मत अनेकांनी व्यत्क केलं आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा