२५ जुलै २०२२: नोकरदार माणसांना सर्वात जास्त वेळ हा ऑफिसमध्ये जातो. यासाठी ऑफिससाठी काही नियम आहेत, जे सर्वसामांन्यांना माहित असणं आवश्यक आहे.
त्यासाठी हे करा…
१. ऑफिसला वेळेच्या आधी या. जेणेकरुन तुम्हाला फ्रेश होऊन सेटल होण्यास वेळ मिळेल.
२. तुमच्या ऑफिसमधल्या सहकार्यांची ओळख करुन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करा. ज्यातून नवीन गोष्टी कळून तुम्हाला कधीही त्यांचा उपयोग
होऊ शकतो.
३. ऑफिसमधल्या कामासाठी वैयक्तिक इमेलचा वापर करु नका. त्यासाठी इंटरनल इमेल तयार करा.
४. ऑफिससाठी फॉर्मल ड्रेसेसचा वापर करा.
५. चेह-यावर हसू आणि कायम ओपन माइंडेड राहून काम करा. याने तुमची आत्मसात करण्याची शक्ती वाढेल.
६. चुका झाल्या तर त्या पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या.
७. नवनवीन प्रकल्पात भाग घ्या.
८. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार रहा
पण हे करु नका…
१. ऑफिसमध्ये पर्सनल ईमेल वाचू नका. त्याला रिप्लायही करु नका.
२. वैयक्तिक संभाषण डेस्कवर करु नका.
३. घरच्या गोष्टी घरी, आणि ऑफिसमधल्या ऑफिसमध्ये, हे गणित आयुष्यभर सांभाळा
४. गॉसिप करु नका.
५. ऑफिसमधल्या कामात स्माईली किंवा इमोजी वापरु नका.
६. रोजच्या केलेल्या कामाची यादी करा.
७. एखादी गोष्ट येत नसल्यास नर्व्हस होऊ नका. शिकण्यासाठी प्रयत्न करा.
८. गाढवाप्रमाणे मेहनत करु नका. स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न करा.
या गोष्टींची काळजी घेतल्यास ऑफिसमधला दिवस नक्कीच आनंदात जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस