ब्रिटन २५ जुलै २०२२ : सध्या ऋषी सुनक हे नाव लोकांच्या तोंडी आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होणार, अशी चर्चा सुरु आहे. लवकरच या गोष्टीचा निकाल लागेल. पण जर ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले तर त्यांची पत्नी अक्षता मूर्ती ही फर्स्ट लेडी होणार. अक्षता मूर्ती कोण आहे, तिचा भारताशी काय संबंध, या सगळ्यांचा न्यूज अनकट ने घेतलेला आढावा…


अक्षता मूर्ती.. भारतातील अग्रगण्य कंपनी असलेल्या इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांची कन्या. अक्षता आणि ऋषी सुनक यांची पहिली भेट अमेरिकेतल्या स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीत झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि अखेरीस २००९ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले.
राणी एलिझाबेथपेक्षा दुप्पट संपत्तीची अक्षता आता मालकिण आहे. अक्षता आता ४२ वर्षांची असून ती पेशाने एक बिझनेस वूमन आहे. तिच्या नावावर इन्फोसिसचे ७६००० करोड किंमतीचे शेअर्स आहे. तर राणी एलिझाबेथ हिची संपत्ती ४६० मिलीयन डॉलर्स आहे. कैटामारन या कंपनीची अक्षता संचालक असून ही कंपनी ऋषी सुनक यांनी २०१३ मध्ये सुरु केली होती. तसेच इन्फोसिस ही कंपनी नारायण मूर्ती यांनी केवळ १०००० रुपयांत सुरु केली होती.
ऋषी सुनक हे देखील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांच्या नावावर तब्बल चार मालमत्ता असून त्यांची श्रीमंती ही निवडणुकीत अडसर होऊ शकते. सध्या ब्रिटनमध्ये आर्थिक परिस्थिती खालावत असताना, असा श्रीमंत पंतप्रधान त्यांच्यासाठी काय करु शकतो, याचा सारासार विचार जनतेकडून केला जात आहे.
लवकरच ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा निकाल लागेल. जर ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाले तर दोन्ही अर्थी भारताची मान उंचावेल. एकतर भारतीय वंशाचा पंतप्रधान आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींची मुलगी फर्स्ट लेडी होईल… ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस