हॉटेलमध्ये बाऊंसरने तरुणाला केली बेदम मारहाण, दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्यानी गेला जीव

पिंपरी चिंचवड २६ जूलै २०२२ : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे‌. एका हॉटेलमध्ये चालक आणि बाउंसर्सने तरुणाला बेदम मारहाण केली. जीवाच्या भीतीनं या तरुणानं दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याच्या प्रयत्न केला.

त्यातच खाली पडल्यानं डोकं फुटून या तरुणाचा मृत्यु झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात ही घटना घडली आहे. द बार हिस्ट हॉटेल मध्ये हा प्रकार घडला. अभय गोंडाने असं मृत तरुणाचे नाव आहे.अभय आणि त्याचा मित्र मनोज कुमार हे दोघे हॉटेल मध्ये गेले होते.

त्यावेळी हॉटेल मालक आणि मॅनेजर गजानन खरात यांनी या दोन तरुणाना मारहाण केली. बाउंसर आणि बार मालक यांनी दोन्ही तरूणांना बेदम मारहाण केली. यावेळी आपल्याला आणखी मारहाण करतील या भितीपोटी अभयने जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. दुसऱ्या मजल्यावरुन पडल्यामुळे अभय याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

त्याच्या मित्राने तातडीने त्याला बिर्ल हॉस्पिटमध्ये दाखल केले. पण प्रकृती गंभीर असल्याने पुढे ससुन हॉस्पिटमध्ये दाखल केले होते.पण उपचारादरम्यान अभय याच्या मृत्यु झाला. मनोज कुमार याने वाकड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

या प्रकरणी हॉटेल मालक, बाउंसर आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली की त्याला ढकलून दिले. याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा