नाशिक २६ जुलै, २०२२ : नुकतीच त्र्यंबक-देवगाव आश्रमशाळेच्या आदिवासी पाड्यात एक अजब घटना घटली. एका आदिवासी मुलीला मासिक पाळी आल्याने तिला वृक्षारोपण करण्यास मनाई करण्यात आली. पण या घटनेचे पडसाद विचित्र रित्या पडत आहे. स्त्रियांना दर महिन्याला सहन करायला लागणारा त्रास म्हणजे मासिक पाळी. महिलांना कायम या त्रासाला सामोरे जावे लागते.
मासिक पाळी म्हणजे महिनाभर शरीरात जमा झालेले दुषित रक्त योनीद्वारा बाहेर टाकले जाते. याला पाळी येणे असे म्हणतात. या काळात स्त्रियांनी स्वच्छता आणि शारिरीक, मानसिक काळजी घेणे जास्त गरजेचे असते.
मासिक पाळीची लक्षणे
१. पाळी यायच्या चार दिवस आधी हातपाय गळून जातात. कंबर दुखणे, असे आजार सुरु होतात.
२. तुमची मानसिकता चिडचिडी होते. तुमचे मूड सतत बदलत राहतात.
३. काहींना योनी मार्गात खाज येण्यास सुरुवात होते.
४. काहींना चेह-यावर पिंपल्स येतात.
घ्यावयाची काळजी.
१.शक्यतो मासिक पाळीच्या काळात आराम करावा.
२. पॅडस वेळोवेळी बदलावं. जेणेकरुन दुर्गंधी येणार नाही.
३. सध्या रबरी मेन्स्ट्रुअल कप आले आहेत. ते दिवसातून दोन वेळा गरम पाण्यात उकळून घ्यावे.
४. टॅम्पून हा देखील बाजारात आलेला नवा पर्याय आहे.
अंधश्रद्धा नको.
पूर्वी स्त्रिया या दिवसभर कष्टाने राबत असत. त्यांना आराम मिळावा आणि स्वच्छता या हेतूने, त्यांना चार दिवस बाजूला बसवले जात असे. पण त्याने विटाळ होतो. देवांना त्रास होतो, अशा प्रकारची अंधश्रद्धा यामुळे पसरवली जात होती. गावात असूनही या प्रथेमुळे महिलांना मानसिक आणि शारिरीक त्रास होत आहे. नुकत्याच घडलेल्या त्र्यंबक-देवगाव परिसरातील घटनेने या प्रश्नाला वाचा फोडली आहे. त्यामुळे जरी हा प्रश्न ऐरणीवर आला, तरी तो अनुत्तरीतच राहणार आहे, हे खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस