नवी दिल्ली: २६ जुलै, २०२२: फेसबुकचे संचालक मार्क झुकरबर्ग यांच्यावर सध्या वाईट दिवस आले आहेत. श्रीमंताच्या यादीत असलेल्या टॉप ३च्या यादीत असलेल्या झुकरबर्ग यांना स्वत:ची अर्धी संपत्ती आणि राहतं घर विकावं लागलं आहे.
झुकरबर्गच्या फेसबुकच्या नेटवर्थमध्ये निम्म्यापेक्षा जास्त घसरण झाल्याने आता झुकरबर्ग थेट १७ व्या नंबरवर फेकले गेले आहे. त्याने सॅन फ्रान्सिस्कोमधील राहतं घर ३.१ कोटी डॉलर म्हणजेच २.४७ अब्ज किंमतीला विकलं आहे. जे घर झुकरबर्गने २०१२ ला १ कोटी डॉलरला खरेदी केलं होतं.
ही वास्तू १९२८ साली उभारण्यात आली असून सात हजार परिसरात ही वास्तू पसरलेली आहे. २०१३ साली झुकरबर्गच्या पत्नी प्रिक्सिला चान हिने घराची डागडुजी करुन घराला नवीन स्वरुप दिले होते. मात्र आता त्याला ते घर विकावे लागले.
सध्या फेसबुक अर्थात मेटाला युट्यूबकडून टक्कर मिळत आहे. त्यामुळे युझर्स आता युट्यबकडे वळत असून त्याचा कंपनीच्या मिळकतीवर परिणाम झाला आहे. फेसबुकच्या शेअर्समध्येदेखील परिणाम झाला आहे. फेसबुकच्या शेअर्सची आजची किंमत १६६.६५ डॉलर्स एवढी असून त्यातील झुकरबर्गकडे १६.८ टक्के शेअर्स आहेत. तसेच गेल्या वर्षी फेसबुकचे २.९१ अब्ज मासिक अँक्टिव्ह युजर्स होते. फेसबुकमध्ये ९७ पेक्षा जास्त टक्के केवळ जाहिरात असून त्याचा फायदा फेसबुकला होत आहे. पण युजर्सची गळती मात्र सुरुच आहे.
मात्र आता या सर्वांवर परिणाम होऊन युट्यूब सारखे प्लॅटफॉर्म फेसबुकला टक्कर देत आहे. त्यामुळे आता त्याची संपत्ती कमी झाली. पण हिच परिस्थिती राहिली तर मात्र फेसबुक लवकरच मागे पडेल यात वाद नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस