फॅशन स्वयंवराची

मुंबई, २७ जुलै, २०२२: विवाह हे आता नातं नसून ती एक फॅशन झाली आहे. आता तर तो सोहळा नव्हे स्टेटस सिंम्बॉल झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा स्वयंवर या नव्या संकल्पनेनं जोर धरला आहे. यात खास करुन बॉलिवूड सदस्यांचा समावेश आहे.

याची सुरुवात मराठी आणि हिंदी अभिनेत्री राखी सावंत हिने केली. राखी सावंत कायम या ना त्या कारणाने चर्चेत आणि वादात राहिली आहे. त्यात तिने स्वत:साठी रचलेले स्वयंवर हे अतिशय चर्चेत होते. त्यात खास करुन तिचे लग्न झाले आहे की नाही, यावरुन वाद होता. पण त्यानंतर अखेर या सर्वांवर तिने पडदा पाडला. सध्या राखी सावंत रितेश या तीच्या जुन्या बॉयफ्रेंडबरोबर असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

पंजाबी गायक आणि अभिनेत्री शेहनाज गिल हिनेदेखील स्वत:चे स्वयंवर रचले होते. पण तिने त्या स्वयंवरात सिद्धार्थ शुक्ला याच्यांबरोबरच्या प्रेमाची कबुली दिली होती. पण त्यानंतर सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर मात्र तिने सध्या एकटं राहण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिव्हिजन अभिनेता पारस छाबडा याने स्वयंवर केले. मात्र शेवटपर्यंत त्याला सहचारिणी मिळाली नाही. राहुल महाजन याने स्वयंवर रचून डिंपी गांगुली हिच्याशी विवाह केला. मात्र हा विवाह दीर्घकाळ टिकला नाही.

टेलिव्हिजन अभिनेत्री रतन सिंह राजपूत हिने स्वयंवर रचून साखरपुडा केला. तो साखरपुडाही कालांतराने तुटला. आता पंजाबी गायक मिका सिंग याने स्वयंवर रचून नुकतेच आपल्या विवाहाचे फोटो सोशल मिडीयावर टाकले. यात त्याने आकांक्षा पुरी हिच्याबरोबर विवाहबद्ध होणार असल्याचं जाहीर केलं. असे होणार विवाह दीर्घकाळ टिकत नसल्याचं दिसून आलं. केवळ शो ऑफ आणि डामडौल असलेले हे स्वयंवर आणि विवाह सोहळ्याला नक्कीच किंमत नाही, हे दिसून आलं आहे. आता मिका सिंह आणि आकांक्षा पुरी यांचा होणारा विवाह किती काळ टिकेल हे, लवकरच कळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा