लालसिंग चड्डाच्या टीझरवरुन अमिरखान टीकेच्या भोव-यात …

मुंबई, २ ऑगस्ट, २०२२: अभिनेता अमिर खान कायमच कुठल्या ना कुठल्या वादात सापडत असतो. या वेळी देखील अमिरखान वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ११ ऑगस्टला हा चित्रपट चित्रपटगृहात रसिकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या टीझरनंतर बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट अमिरखान, बॉयकॉट लालसिंग चड्डा.. असे ट्विट पडत आहेत. यावj अमिर खानने आपले मत नोंदवले आहे. त्याने प्रतिक्रिया देत सांगितलंय की, जेव्हा लोक बॉलिवूड आणि लालसिंग चड्डावर बहिष्कार टाकण्याबद्दल मत देत आहेत, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. विशेषत: जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी करतात. त्यांना वाटतं की मी अशा लोकांच्या यादीत आहे, ज्यांना भारत आवडत नाही. पण हे खरं नाही. काही लोक असा विचार करतात हे दुर्दैवी आहे. कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. तो थिएटरमध्ये जाऊन एकदा पहा.”

त्याचवेळी आता करीना कपूर खानने बॉलिवूडमधील ‘कॅन्सल कल्चर’वर आपलं मत मांडलं आहे. करीना म्हणाली, “आजकाल प्रत्येकाचं स्वतःचं मत असू शकतं, पण एक चांगला चित्रपट कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो यावर माझा विश्वास आहे.” करीनाने तिच्या चित्रपटाला विरोध न करण्याची विनंती केली आहे. ती पुढे म्हणाली, “कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. तो चित्रपट आधी थिएटरमध्ये जाऊन पहा. आजच्या काळात प्रत्येकाचं मत वेगळं असतं. आज प्रत्येकाला आपला आवाज आहे. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे आता असं होणार असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकावं लागेल. अन्यथा तुमचं जगणं कठीण होईल आणि म्हणूनच मी अशी कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेत नाही.”

मला जे पोस्ट करायचे आहे ते मी पोस्ट करते, असंही करीना कपूर म्हणाली. “जर तो चांगला चित्रपट ठरला तर मला खात्री आहे की तो इतर कोणत्याही गोष्टीला मागे टाकेल आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल”, असा विश्वास तिने व्यक्त केला.

अमिर खान कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने वादात असतो. आज लालसिंग चड्डामुळो तो टीकेचा धनी झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो कुठल्या कारणाने टीकेला बळी पडतो, हे पहायला ११ ऑगस्ट उजाडावी लागणार हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा