म्यानमार, ०४ ऑगस्ट २०२२: म्यानमारच्या नॅचरल रिसोर्सेस आणि पर्यावरण संवर्धन मंत्रालयाने, म्यानमारच्या राखीन राज्यातील तौंगप टाउनशिपमध्ये दुर्मिळ ‘पांढरा हत्ती’ जन्माला आल्याची माहिती दिली.
२३ जुलै रोजी सुमारे १८० पौंड वजनाने जन्मलेल्या पांढऱ्या हत्तीच्या बछड्याची खांद्याची उंची दोन फूट पाच इंच तर शरीराचा घेर तीन फूट एक इंच आणि मागची लांबी दोन फूट मोजण्यात आली. शेपटीची लांबी सहा इंच आहे, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हंटले आहे.
म्यानमारमध्ये दुर्मिळ पांढरा हत्ती ‘शुभ प्राणी’ मानला जातो.
१० दिवसांचा हा हत्तीचा बछडा निरोगी आणि आईसोबत आनंदी आहे, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हंटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरूराज पोरे