पुणे, ८ ऑगस्ट २०२२: Redmi ने बाजारात आपला लेटेस्ट 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनला Redmi 10 5G असे नाव दिले आहे. हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. या 5G फोनची किंमत खूपच कमी ठेवण्यात आली आहे. यात ५०-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात मोठी बॅटरी देखील आहे.
Redmi 10 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Redmi 10 5G मध्ये ६.५८-इंचाची IPS LCD स्क्रीन आहे. हा स्मार्टफोन फुल एचडी + रिझोल्यूशनसह येतो. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1080 x 2048 आहे. त्याचा रीफ्रेश रेट ९०Hz आहे. यात गोरिला ग्लास प्रोटेक्शन देखील आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी या डिव्हाईसच्या फ्रंटमध्ये ५-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा ५०-मेगापिक्सेल आहे. यासोबत २-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.
Redmi 10 5G मध्ये Dimensity 700 चिपसेट वापरण्यात आला आहे. हा LPDDR4x रॅम आणि UFS २.२ स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन अनेक व्हेरीएंट्स मध्ये ऑफर केला आहे. ४GB RAM + ६४GB स्टोरेज व्यतिरिक्त, तुम्ही हा फोन ४GB RAM + १२८GB स्टोरेज किंवा ६GB RAM + १२८GB स्टोरेज पर्यायामध्ये खरेदी करू शकता.
हा स्मार्टफोन Android 12 आधारित MIUI 13 वर काम करतो. या फोनमध्ये ५,०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच पॅकमध्ये २२.५W चा चार्जर देखील देण्यात आला आहे. तथापि, डिव्हाइस केवळ 18W चार्जिंगला सपोर्ट करतो. सुरक्षिततेसाठी, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक आहे.
Redmi 10 5G मध्ये ड्युअल सिम, ब्लूटूथ ५.१, NFC, GPS, USB-C पोर्ट आणि ३.५mm ऑडिओ जॅक आहे.
Redmi 10 5G किंमत आणि उपलब्धता
Redmi 10 5G सध्या थायलंड आणि इंडोनेशियामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची किंमत सुमारे १४,००० रुपयांपासून सुरू होते. सध्या याच्या भारतीय लॉन्चबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु, असे मानले जाते की हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. हा अरोरा ग्रीन, क्रोम सिल्व्हर आणि ग्रेफाइट ग्रे कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे