सीड मदर, पदमश्री राहीबाई पोपरे यांनी बनविल्या धान्य बीज राख्या

अहमदनगर, ११ ऑगस्ट २०२२: राहीबाई पोपरे यांना त्यांच्या कार्या मुळं तसेच प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकरी भावांच्या मायेचा आदर राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केलीय.

नागली, भोपळा, वरई, काकडी, भात यांसारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा (सीड्स) वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हातानं बनवल्या आहेत. राहीबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या (सीड बँक) रूपातील कार्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या त्या बहीण बनल्या आहेत.

मंत्री चंद्रकांत पाटील हे राहीबाई यांना आपल्या भगिनी मानतात. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीसाठी म्हणून विशेष बीज राख्यांची निर्मिती केल्याचं त्यांनी सांगितलं.

बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिलंय. राखी पौर्णिमा या सणानिमित्त त्यांनी सर्व देश बांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा