पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात चर्चा, घेतला अनेक द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी संरक्षण सहकार्य प्रकल्प आणि नागरी अणुऊर्जेतील सहकार्यासह विविध द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेतला. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फोन संभाषणादरम्यान त्यांनी जागतिक अन्न सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या भौगोलिक राजकीय आव्हानांवरही चर्चा केली.

भारत आणि फ्रान्स सध्या रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषणाच्या जोखमीवर चिंता व्यक्त करत आहेत. निवेदनात म्हंटलंय की, मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदींनी फ्रान्समध्ये सुरू असलेला दुष्काळ आणि जंगलातील आगीच्या मुद्द्यावर एकता व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी अलिकडच्या वर्षांत भारत-फ्रेंच धोरणात्मक भागीदारीच्या सखोलतेबद्दल आणि सामर्थ्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि सहकार्याच्या नवीन क्षेत्रांमध्ये संबंध विस्तारण्यासाठी एकत्र काम करणं सुरू ठेवण्याचं मान्य केलं.

पीएमओच्या निवेदनात असेही म्हटले आहे की दोन्ही नेत्यांनी संरक्षण सहकार्य प्रकल्प आणि नागरी अणुऊर्जेतील सहकार्यासह सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा घेतला. अलिकडच्या वर्षांत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या सखोलतेबद्दल आणि सामर्थ्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केल्याचं वृत्त आहे. सहकार्याच्या नवीन क्षेत्रांमध्ये संबंध विस्तारण्यासाठी एकत्र काम करत राहण्याचे त्यांनी मान्य केलंय.

याआधी सोमवारी, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मॅक्रॉन यांनी दिलेल्या शुभेच्छांनी मी प्रभावित झालो आहे. ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाले, ‘प्रिय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेला, तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारत प्रत्येक परिस्थितीत फ्रान्सवर विश्वास ठेवू शकतो, आम्ही प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत उभे आहोत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा