मोती शेती

निसर्गात, जेव्हां एखादा परकीय कण उदा. वाळूचा कण किंवा लहानसा कीटक चुकून शिंपल्यामध्ये घुसला आणि शिंपला त्यास बाहेर घालवू शकला नाही, तर तो त्या कणाभोवती एक चमकदार आवरण तयार करतो. या आवरणाचे थरावर थर जमून मोती तयार होतो. याच साध्यासोप्या तत्त्वाचा वापर मोत्यांची शेती करतानाही करण्‍यात येतो.

     मोती हा शंबुकाच्‍या (शिंपल्याच्या) आतील चमकदार आवरणासारखाच असतो. या आवरणास ‘मातृआवरण’ असे म्हणतात. हे आवरण कॅल्शियम कार्बोनेट, जैविक पदार्थ आणि पाणी यापासून तयार झालेले असते. बाजारात उपलब्ध असणारे मोती कृत्रिम, नैसर्गिक किंवा संस्करीत असू शकतात. कृत्रिम मोती हे प्रत्यक्षात मोती नसून मोत्यासारख्या दिसणार्‍या पदार्थाचे टणक, गोलाकार आणि मोत्यासारखे बाह्यावरण असणारे मणी असतात. नैसर्गिक मोत्यांमध्ये केंद्रक अतिशय सूक्ष्म असते आणि त्याच्या सभोवताली मोत्याचे जाड आवरण असते. सामान्यतः नैसर्गिक मोती आकाराने लहान आणि वेडावाकडा असतो. संस्करीत मोतीसुध्‍दा नैसर्गिक मोतीच असतो फक्त तो मानवी हस्तक्षेप करून तयार करण्यात आलेला असतो. यामध्ये सजीव आवरण आणि केंद्रक मानवी हस्तक्षेपाद्वारे तयार करण्‍यात येते ज्यामुळे मौक्तिक निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगवान होते आणि मोतीसुध्‍दा हवा त्या आकाराचा, रंगाचा बनविता येतो. भारतात, गोड्या पाण्यातील शंबुकाच्या तीन प्रजाती उपलब्ध आहेत त्या म्हणजे: लॅमेलिडेंस् मार्जिनालिस, एल. कोरिआनस आणि पारेसिआ कोरुगाटा. यापासून चांगल्या दर्जाचे मोती तयार होतात.  

मोत्यांचे तीन प्रकार :-

  1. नैसर्गिक 
  2. संवर्धित 
  3. कृत्रिम

       यातला संवर्धित मोती हा ठराविक प्रकारच्या मोती संवर्धित करावयाच्या शिंपल्यात एक छोटीशी शस्रक्रिया करून न्युक्लीअसचे (ठराविक शिंपल्याचा एक तुकडा अगर भुकटी) रोपण करून गोड्या पाण्यात तो शिंपला ३ वर्षे ठेवला जातो. आणि त्या शिंपल्यात तयार झालेला मोती संवर्धित मोती होय.हा मोती नैसर्गिक मोत्यासारखाच असतो. तेवढयाच गुणवत्तेचा असतो.

      कृत्रिम मोती मात्र काचेचे तुकडे किंवा मनी माशाच्या खावल्यांपासून बनवलेल्या द्रावणात बुडवून जो थर निर्माण होतो. तो  वाळवून मोती तयार केला जातो. अर्थात, या मोत्यावरचा हा थर कालांतराने फिका पडतो. थर निघून जातो. तसेच या कृत्रिम मोत्याचा आरोग्यासाठी उपयोग होत नाही.तो खोटा असतो. मात्र संवर्धित मोती हा खरा असतो. अशा मोत्याची निर्मिती करण्यासाठी गोडे पाणी, विशिष्ट प्रकारचा जिवंत शिंपला आणि ग्राफ्त टिश्यू न्युक्लीअस इ.गोष्टी आवश्यक असतात.

    खाऱ्या पाण्यातील कवचधारी (शिंपला) मत्स्य जीवापासून मिळणारे मोती हे उच्च गुणप्रतीचे असतात पण त्याचे संवर्धन करणे जाकीरीचे असते. गोडया पाण्यातल्या कवचधारी मत्स्याजीवापासून मोती तयार करण्याचे तंत्र करण्यासारखे असते. हे मोती हि उच्च प्रतीचे असतात. यांच्यापासून मोती निर्मिती करणे हि एक फायदेशीर आणि जमेची बाब आहे. त्यांचा गोडया पाण्यातला साठा मोठा असतो. त्यांना उपद्रव कमी असतो ,आणि संवर्धनाची पद्धत सोयीस्कररीत्या विकसित करता येते. म्हणून गोडया पाण्यातल्या शिंपल्यापासून (कवचधारी मात्स्याजीव ) मोती मिळवणे सोपे जाते.

    गोडया पाण्यात एकूण ५० प्रकारचे शिंपले आहेत, पण त्यातल्या संथ आणि वाहत्या पाण्यातल्या २-३ जातीच फक्त मोत्याच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे आणि लामिलीडेंस मार्जीलेनीस आणि लामिलीडेंस कोरीआनसीस या संथ पाण्यांतल्या, तर वाहत्या पाण्यातल्या पराशिया कोरुगेटा यांचा  मोती संवर्धनासाठी वापर करावा.

     प्रत्यक्ष मोत्यांचे संवर्धन करण्यासाठी असे शिंपले गोळा करून संवर्धन करण्याच्या ठिकाणी आणावेत. न्युक्लीअस रोपण शस्रक्रियेकरिता भृण प्रत्यारोपण पद्धतीसारखेच डोनर आणि रेसिपंटची आवश्यकता असते. डोनर म्हणजे रोपणाकरिता लागणाऱ्या टिश्यूची पूर्तता करणारा शिंपला आणि रेसीपंट म्हणजे रोपण शस्रक्रिया करवून घेऊन प्रत्यक्ष मोती संवर्धन करणारा शिंपला. डोनर शिंपल्यातून विशिष्ट पद्धतीने ग्राफट टिश्यू आणि मॅटल टिश्यू मिळवण्यात येतो. हे ग्राफ्त टिश्यू आणि मॅटल टिश्यू रेसीपटमध्ये  न्युक्लीअस  रोपणासाठी वापरतात.

      प्रत्यक्ष न्युक्लीअस रोपण करण्यासाठी तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची थोडी फार गरज असते. प्रशिक्षण घेतल्यास   न्युक्लीअस (वेगवेगळ्या कलम पद्धतीचे प्रशिक्षण घेतल्याप्रमाणे) करणे सोपे जाते. मार्च ते मे या दरम्यान हि न्युक्लीअस रोपण शस्रक्रिया करण्यासाठी चांगला कालावधी असतो. कारण शास्रक्रियेची जखम लवकर भरते.     मोती तयार होण्याची प्रक्रिया वेगात होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा