आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी जळगावात तनाव, बॅनर फाटले

जळगाव, २० ऑगस्ट २०२२: युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर येत आहे. मात्र त्यांच्या दौऱ्या अगोदरच शिंदे गट व उद्धव ठाकरे समर्थक आमने सामने आल्याचे दिसत आहे. धरणगावात आदित्य ठाकरेंचे लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले आहेत.

शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यात येत आहे. पाचोरा धरणगाव पारोळा या बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होणार आहेत. आदित्य ठाकरे ज्या मार्गाने येणार होते धरणगावात प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरचे बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

त्यामुळे काही काळ मोठा तनाव निर्माण झाला होता. “शिवसंवाद” यात्रा दौरा आज दुपारी एक वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आयोजित केला आहे. पण शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर या ठिकाणावरचा बॅनर फाडल्याचे प्रकार घडला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी शांत राहण्याचे आवहान केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा