अजित पवार यांच्या विरोधातील पुरावे आम्ही रद्दीत विकलेत: एकनाथ खडसे

मुंबई: हेतू पुरस्सर मला, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि इतर अशा काही जणांना प्रचाराच्या दरम्यान बाहेर ठेवण्यात आले. त्याच्यामुळे निश्चितच पक्षाला फटका बसला. असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भाजपला महाराष्ट्रातून सत्ता गमवावी लागल्यानंतर खडसेंचाउद्रेक झाला. अजित पवार यांच्या विरोधात असलेले बैलगाडीवर पुरावे आम्ही रद्दीत विकलेले आहेत, अशी आगपाखड खडसेंनी केली.
आम्हाला सोबत घेऊन चालला असतात, तर वीस पंचवीस जागांचा फरक निश्चितच पडला असता. याचा जाब आम्ही वेळोवेळी पक्षाला विचारलेला आहे. अशा शब्दात एकनाथ खडसेंनी संताप व्यक्त केला.
वर्षानुवर्ष काम केलेल्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचे जनमानसात चित्र आहे. सर्वांनी एकत्र काम केलं तर पक्षाला बळ मिळतं. पक्षात नवीन आणलेल्यांना तिकीट दिल्याचाही फटका बसला. पार्टी विथ डिफरन्स या भाजपच्या बिरुदाला, भ्रष्टाचारविरोधी प्रतिमेला धक्का पोहचला. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना सोबत घ्यायला नको होतं, असं माझं मत असल्याचं खडसे म्हणाले.

२९१४ मध्ये युती तोडण्याचा सामूहिक निर्णय झाला होता. पण विरोधपक्ष नेता म्हणून ते जाहीर करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. सहा महिन्यांनी चूक दुरुस्त करत सेना-भाजप सरकारमध्ये एकत्र आले. २०१९ मध्ये महायुतीला मतदान करत जनतेने १६१ आमदारांना निवडून आणत सेना-भाजपला बहुमत दिले. परंतु दुर्दैवाने मुख्यमंत्रिपद कोणाला आणि किती वर्ष यावर एकमत न झाल्याने सेना-भाजप वेगळे झाले, असं खडसे म्हणाले.

भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यासारख्या मंत्र्यांना भाजपने तिकीट नाकारलं होतं. खडसेंऐवजी कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती.परंतु त्यांनाही पराभवाचा धक्का बसला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा