जम्मू काश्मीर, २५ ऑगस्ट २०२२: जम्मू काश्मीरच्या राजोरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा जवानांनी उधळून लावला आहे. भूसुरुंग स्फोटामध्ये दोन दहशतवादी ठार झाले आसून एकाला ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्याला या आधीही नियंत्रन रेषा पार केल्यामुळे अटक करण्यात आले होते. पण मानुसकीच्या नात्याने त्याला पुन्हा परत पाठवण्यात आलं होतं. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्याने त्याला तीस हजार रुपये(पाकिस्तानी चलन) दिले होते असेही लष्कराने सांगितले आहे.
तबरक हुसैन असं या दहशतवाद्याचं नाव आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील कोटली जिल्ह्याचा तो राहणारा आहे. चौकशी केली असता त्याने आपल्याला पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेमधील कर्नल युनूस चौधरी याने पाठवल्याचं सांगितलं आहे. मात्र यामधील दोन दहशतवादी पाकिस्तानव्याप्त प्रदेशात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. अशी माहीती लष्कराने दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर