खास पालकांसाठी

6

पुणे, २९ ऑगस्ट २०२२: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असत की, आपली मुले हुशार, स्वावलंबी आणि कर्तबगार व्हावी. पण सध्याच्या काळात खास करुन कोरोनामुळे आई-वडिलच बाहेर पडायला घाबरत होते, तिथे मुलांची काय कथा.

अशा वेळी आई-वडिलांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेऊन त्यांना काही जबाबदारी दिल्यास मुले नक्की सक्षम होतील. यासाठी मुलांना काही काम सोपवली पाहिजेत. तसेच मुलांना सक्षम करण्यासाठी त्यांना त्यांच्या सक्षमतेची जाणीव करुन देणं गरजेचं आहे, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…

वर्षानंतर मुलांना थोडी-थोडी घरातली कामे करण्यास सांगा. ज्यामुळे त्यांना काम केल्याचा आनंद वाटेल.

स्वत:चे कपडे, किंवा स्वत:च्या वस्तू खरेदी करण्यास सांगा. त्यांने त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

सध्याच्या मुलांसाठी मोबाईल ही गरजेची वस्तू झाली आहे. त्यामुळे त्यांना ऑनलाईन कॅब, सिनेमा तिकिटे किंवा ग्रोसरी खरेदी करण्याची मुभा द्या. त्यामुळे त्यांना वाटेल की मी घरात काम करतो आहे.

स्वत:च्या कपड्यांना इस्त्री करणे, स्वत:ची खोली आवरणे, यांसारखी कामे त्यांना करण्यास सांगा.

सुट्टीच्या दिवशी त्यांना आपल्या आवडीचा मेन्यू तयार करण्यास सांगा. जेणेकरुन स्वयंपाकघरातली त्यांची लुटबूड वाढेल. ज्याचा त्यांना आनंद होईल.

एक दिवस किंवा चार पाच दिवसांच्या सहलीची ठिकाणे शोधून त्याचे प्लॅनिंग करण्यास सांगा.

महिन्यातून एकदा त्यांना एकटे ट्रेक किंवा ट्रिपला पाठवा. त्यामुळे त्यांना मित्रांबरोबर कसे सामील होतात, हे समजेल.

एक ट्रिप कुटंबाबरोबर देखील ठरवायला सांगा. त्यामुळे नातेवाईक किंवा घरातल्या लोकांचे स्वभाव त्यांना समजतील.

गेट-टुगेदर, वाढदिवस यांचे पूर्ण प्लॅनिंग त्यांना करायला सांगा. त्यानंतर त्यांचे कौतुकही करा. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढेल.

मुलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी वरील टिप्स नक्कीच उपयोगी पडतील. पण या गोष्टी पालकांनी करणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस