पालघर, ३ सप्टेंबर २०२२: देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या अणुऊर्जा प्रकल्प आणि भाभा अणुशक्ती केंद्रात सुरक्षारक्षक असलेल्या केंद्रीय औधोगिक सुरक्षा दलाचा जवान रायफल आणि तीस जिवंत काडतूसांसह काल पासून बेपत्ता असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मनोज यादव असं या सीआयएसएफच्या जवानाचं नाव असून तो कालपासून फरार असल्याची माहिती समोर आली आहे. मनोज यादव हा सुरक्षारक्षक काल सकाळी कामावर हजर झाला. मात्र त्यानंतर तो अचानक ऑन ड्युटी असताना फरार झाला. या जवानाजवळ एलएमजी रायफल आणि तीस जिवंत काडतूसं असल्याचं उघड झाला असून त्याचा शोध घेतला जातोय.
काल दिवसभर शस्त्रास्त्रांसह अचानक गायब असलेला सीआयएसएफचा जवान पुन्हा कामावर रुजू होईल असं स्थानिक सीआयएसएफच्या कर्मचारी आणि अधिकारी यांना वाटत होतं. मात्र तो आजही न परतल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी तारापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर