रस्ते, कार, अपघात आणि…

पुणे, ६ सप्टेंबर २०२२: रस्ते, कार, अपघात आणि मृत्यू हे सत्र गेले काही दिवस सुरुच आहे.
याची सुरुवात झाली नुकतीच विनायक मेटे यांच्या अपघाताने. विनायक मेटे यांच्या कारला अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच नुकत्याच आणखी एका अपघाताची यात भर पडली. त्यात टाटाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा नुकताच कार अपघातात मृत्यू झाला. हे प्रकरण तर कालचेच. तर आज भाजपचे नेते नितेश राणे यांच्या कारला अपघात झाला. सुदैवाने त्यांच्यापैकी कोणाला इजा झाली नाही.

पण हे सत्र जरा जास्तच जोरात सुरु आहे. साधारण १००० गाड्यांमागे ०.८ टक्के गाड्यांना अपघात होतो. साधारण वर्षाला एक लाख लोकं कार अपघाताने मृत्यू पावतात. ही आकडेवारी होती २०१५ ची. यात आता भर पडली असून हा ०.८ टक्का थेट एक टक्क्यावर गेला आहे. या नुसार २०१८ पर्यंत हा आकडा वाढून वर्षाला दहा लाखांपर्यंत गेला आहे.

पण या सगळ्यामागचे मूळ कारण मात्र समजायला मार्ग नाही. दिवसागणिक वाढणारी लोकसंख्या, वाढणाऱ्या कारची किंवा टू व्हिलरची संख्या आणि मानसिकता या सगळ्याचा परिणाम आता अपघातांवर व्हायला लागला आहे. नवीन पिढी ही सोशल पिढी म्हणून ओळखली जाते. पण नियम आणि काटेकोरपणा हा यात नसल्यामुळे त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून ढिसाळपणा कळतो. त्यातून स्पीड लिमीट न सांभाळणे, ट्रिपल सीट जाणे, अशा अनेक कसरतींमधून स्वत:चा जीव धोक्यात घालणे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले.
यातच आता राजकारणी, उद्योगपती यांच्या अपघाताची नोंद होऊ लागल्याने सर्वसामांन्यांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे. हेच वास्तव आहे. आजचा दिवस आपला असं म्हणायची वेळ आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा