जॉब हवा तर असा…

पुणे;६ सप्टेंबर २०२२ : तुम्ही ऑफिसला गेला आहात आणि तुम्हाला काहीच काम करायचं नाही. पण ऑफिसमध्ये मात्र जाऊन बसायचं आणि त्याचा तुम्हाला पगार मात्र मिळणार. ऐकून जरा अजब वाटतंय ना… पण ही वस्तूस्थिती आहे. भारतातली नक्कीच नाही. पण हो जपानमधली. जपानमधला हा आहे ३८ वर्षीय शोजी मोरीमिटो. हा टोकियो शहरात राहतो. याचा पगार आहे महिना दहा हजार येन. पण याचं काम काय? असं विचारल तर याचं उत्तर आहे …काही नाही…

येणा-या ग्राहकांबरोबर गप्पा मारणे, त्यांच्याबरोबर गार्डनमध्ये फेरफटका मारणे आणि काहीच नाही तर ऑफिसमध्ये बसून टाईमपास करणे. ग्राहकांशी अनोळखी माणसांसारख्या गप्पा मारणे.

यावर शोजीला विचारले असता, शोजी सांगतो की मी स्वत:च्या शरीराचे रेंट म्हणजे भाडं घेतो. मी तुमच्याबरोबर येतो. म्हणजे मी तुमच्यासाठी माझा वेळ देतो. या जॉबसाठी शोजी महिना दहा हजार येन घेतो. मी काही करत नाही. याचा अर्थ मी खूप काही करतो असा आहे. गेल्या चार वर्षात मी चार हजारापेक्षा जास्त अशा सेशनमध्ये केवळ गेलो आणि गप्पा मारत बसलो.

मागच्या महिन्यातला एक प्रसंग शोजीने शेअर केला. त्याने सांगितलं की, तो एका २७ वर्षीय डेटा अँनालिसिस्टला भेटला. तिच्याबरोबर त्याने भारतीय पोशाखावर गप्पा मारल्या. यावर त्याने असंही सांगितलं की काहीही न करणे यासाठी जे कौशल्य लागतं, ते खूप महत्त्वाचं आहे.
वास्तविक आमच्याकडच्या लोकांना कळलं आहे, की काहीही न करणे हेच महत्त्वाचं आहे. जे इतरांसाठी गरजेचं आहे. ज्यासाठी तेथे अनेक पैसे मोजले जातात. हेच लोकांसाठी जास्त मोलाचं आहे.

जपानमध्ये अशा प्रकारच्या नोक-या आता उपलब्ध होत आहे. ज्यामुळे ग्राहकांचे मन रिझवून कंपनीला फायदा होतो. ज्यासाठी जपान अशा लोकांना बोलावून नोक-या देत आहे. बघा…तुम्हीही तुमचा बायोडेटा पाठवून द्या आणि पहा तुमचा नंबर लागतो का ?

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा