महिलेने दिला “प्रेग्नेंट बालिकेला” जन्म

इंग्लड : घरात छोट्या बाळाचे आगमन होणे यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीच नाही. पण इंग्लडमधील एका महिलेने ‘प्रेग्नंट बालिकेला’ला जन्म दिल्याने खळबळ उडाली आहे.
जन्माच्या दुसऱ्याच दिवशी या नवजात बालिकेवर तातडीने ‘सी सेक्शन ‘शस्त्रक्रिया करून तिच्या पोटात वाढणारे भ्रूण बाहेर काढण्यात आले. बालिकेची प्रकृती स्थिर असून आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मोनिका वेगा’ असे या महिलेचे नाव असून ती कोलंबियाची आहे. तर तिने तिच्या नवजात बालिकेचे नाव ‘इत्जामरा’ ठेवले आहे.
याबाबत ‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोनिकाची प्रसूती होण्याआधीच तिच्या पोटातील बाळाच्या पोटात गर्भ असल्याचे डॉक्टरांना माहित होते. अल्ट्रासाऊंड दरम्यान याबद्दल डॉक्टरांना कळाले होते. तिच्या पोटातील बाळ दोन नाळांनी जोडले गेल्याचे डॉक्टरांना सोनोग्राफीत कळाले होते. त्यामुळे मोनिकाची प्रसूती वेळेच्या आधी करणे गरजेचे होते. नाहीतर बालिकेच्या पोटातील गर्भाची वाढ झाल्यास ते तिच्या जीवावर बेतणार होते.

यास ‘fetus in fetu’ बोलले जाते. यामुळे डॉक्टरांनी वेळेआधीच मोनालिसाची प्रसूती केली. त्यानंतर इत्जामरावर शस्त्रक्रिया करण्यात आली व तिच्या पोटातून अविकसित भ्रूण मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले. इत्जामरा सुखरुप असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा