मुंबई, १४ सप्टेंबर २०२२ : तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. १४ वर्षांनंतर ही या मालिकेची लोकप्रियता अजूनही कायम आहे. मात्र गेल्या काही महिन्यात काही कलाकारांनी ही मालिका सोडली. त्यापैकी ‘तारक मेहता’ अर्थात अभिनेते शैलेश लोढा यांनी या मालिकेला रामराम म्हटले होते. त्यांच्या एक्झिटमुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. आता या मालिकेशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे.
शैलेश लोढा ने मालिका सोडल्यानंतर त्याच्या जागी मालिकेत कोणता कलाकार झळकणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. पण आता निर्मात्यांनी तारकच्या भूमिकेसाठी नव्या कलाकाराची निवड केली आहे. टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता सचिन श्रॉफ हे तारक मेहता ची भूमिका आता साकारणार आहे.
नुकतेच गोकुळधाम सोसायटी मध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी नवीन ‘तारक मेहता’ ची एन्ट्री झाली आहे. सचिन श्रॉफने अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. सचिन श्रॉफ काही महिने अगोदर ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या आश्रम या लोकप्रिय वेब सिरीज मध्येही झळकला होता.
या आधीही दिशा वकानी ,भव्य गांधी, नेहा मेहता, निधी भानुशाली, राज अनादकट, सह अनेक कलाकारांनी या पॉप्युलर शो सोडला होता. त्यानंतर त्यांच्या जागी नव्या कलाकारांची एन्ट्री झाली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव