दक्षिण आफ्रिकेला धक्का, कोच बाऊचर टी ट्वेंटी ‘वर्ल्डकप’ नंतर देणार राजीनामा.

5

पुणे, १५ सप्टेंबर २०२२ : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकप साठी प्रत्येक देश संघ जाहीर करत असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकप १५ ऑक्टोबरला सुरुवात होणार असून स्पर्धेसाठी फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना दक्षिण आफ्रिका संघाच्या मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर हा राजीनामा देणार आहे.

इंग्लंड दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्याची मालिका ‘दोन एक’ अशी गमावली असतानाच ही बातमी समोर आली आहे. आता आफ्रिकेचे संघ वर्ल्डकप च्या तयारीला लागला आहे. दक्षिण आफ्रिकेला अजून पर्यंत एकही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.

मार्क बाउचर यांच्या राजीनाम्याची बातमी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दिली आहे. बोर्डाने बाऊचर चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात हेड कोच मार्क बाऊचर हे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्डकप नंतर राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे.

बाऊचर यांनी डिसेंबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाची धुरा सांभाळली होती. बाऊचर यांच्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने दहा, टेस्ट मॅच मध्ये यश मिळवले तर १२, वनडे आणि २३, टी ट्वेंटी मध्ये विजय मिळवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव