वेदांत फॉक्सकॉनचा सलग्न प्रकलप महाराष्ट्रात

8

मुंबई,१५ सप्टेंबर २०२२: अनिल अग्रवाल यांनी वेदांतचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचे वचन दिले आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून वेदांता फॉक्सकॉन च्या अध्यक्षांचे म्हणजेच अनिल अग्रवाल यांचे आभार मानत विरोधकांना टोला लगावला आहे. वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरात मध्ये गेल्यापासून महाराष्ट्रात राजकारण तापले होते.

” हा हजारो कोटींचा दीर्घकालीन प्रकल्प असून गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्रात अशा विविध राज्यांमध्ये आम्ही अनेक वर्षांपासून जागेसाठी पाहणी करत होतो. मात्र, गुजरात मधून आम्हाला स्पर्धात्मक आणि चांगल्या ऑफर मिळाल्यामुळे, आमच्या गरजा पूर्ण झाल्यामुळे, गुजरात मध्ये हा प्रकल्प आम्ही घेऊन जात आहोत”, असं त्यांचं म्हणणं आहे.

विरोधकांनी फडणवीस आणि शिंदे यांची चांगलीच कोंडी केल्यानंतर हा सलग्न प्रकल्प खरच महाराष्ट्राच्या जखमेवर मलम लावणार का? हे येता काळच ठरवेल आणि दिलेले वचन आणि अग्रवाल पाळणार का? हे देखील येत्या काळात कळेलच!

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड