कोल्हापूर, १६ सप्टेंबर २०२२ : महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत, लेखापरीक्षण अहवाल मांडणे, त्यात तो मंजूर होणे, सर्वसाधारण सभा या पैकी काहीही न घडता, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, मेघराज राजेभोसले यांनी, मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रशांत पाटील यांच्या सोबत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. जाहीर कार्यक्रमानुसार २० नोव्हेंबरला मतदान व २२ तारखेला निकाल जाहीर होईल.
महामंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली, पण कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक लावण्यात आली नव्हती. मुदत संपल्यानंतर कार्यकारिणीने मेघराज राजेभोसले यांना बाजूला करत बहुमताने सुशांत शेलार यांना अध्यक्ष म्हणून निवडलं होतं. त्यामुळे मोठा वाद झाला. महामंडळाचे कामकाज ठप्प झाले होते. दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप झाले. कोर्टात जायच्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. निवडणूक होऊन कामकाज सुरळित चालावे यासाठी मागील महिन्यात सभासदांनी महामंडळावर मोर्चा काढला होता.
या सर्व परिस्थिती वर उपाय म्हणून अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संजय ठुबे, ॲड. प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे