किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

                                             पन्हाळागड

“पन्हाळ गडाला साधारण १२०० वर्षांचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते. व पाली भाषेतील आहे.येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला.”

पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे. सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. याच पन्हाळ गडाला सिद्दी जोहारने वेढा दिला होता. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफिने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली. बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशिद यांनी या सुटकेत महाराजांना मदत केली. शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी स्वराज्याची सूत्रे येथूनच हाती घेतली.

पन्हाळ्याच्या बाजूने कोकणात जायला अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सध्याच्या स्थितीला हा एकमेव असा किल्ला आहे कि ज्याचे अवशेष अजून सुस्थितीत पाहायला मिळतात. पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. कोल्हापूरपासून २० कि.मी.अतंरावर आहे.

पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हटले जाते. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. महाराष्ट्रामधील एकमेव टिकून राहिलेला किल्ला म्हणून याकडे पहिले जाते.भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला होता. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.

१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद याबरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा