मुंबई, २० सप्टेंबर २०२२ : सोशल मीडिया ॲप इंस्टाग्राम ने एका विद्यार्थ्याला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट मध्ये बग सापडल्याने ३८ लाख रुपयाचे बक्षीस दिले, राजस्थानची राजधानी जयपूर मधील रहिवासी असलेला नीरज शर्माला इंस्टाग्राम वरून बग सापडला आहे. जगभरात इंस्टाग्राम चे दोन अब्ज युजर्स आहेत, तसेच या बग मुळे अनेक युजर्स चे अकाउंट हॅक झाले होते.
इंस्टाग्राम मध्ये शोधलेल्या बग मुळे लॉग इन आयडी आणि पासवर्ड शिवाय इंस्टाग्राम युजरच्या अकाउंट मधील थंबनेल बदलणे शक्य झाले होते, तसेच मजबूत पासवर्ड असले तरी अकाउंट मधले सगळे बदलले जाऊ शकते. पण आता हा दोष (बग ) दूर करण्यात आला आहे.
नीरज ने ही माहिती वृत्तपत्रांना दिली आहे. नीरज शर्मा हा वीस वर्षीय असून, वायफाय हॅक करण्यासाठी तो ऑनलाइन हॅकिंग शिकला. नीरज च्या सांगण्यानुसार गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये त्याला इंस्टाग्राम अकाउंट मध्ये दोष दिसू लागला होता आणि तो बग खूप शोध व मेहनती नंतर ३१ जानेवारीला सापडला. यासंदर्भात नीरज ने संपूर्ण माहिती इंस्टाग्राम आणि फेसबुकला पाठवली त्यानंतर नीरज ला तीन दिवसांनी उत्तर आले पण त्यांना नीरज वर विश्वास बसला नाही. नंतर इंस्टाग्राम ने एक डेमो शेअर करायला सांगितला, त्यानंतर नीरज ने इंस्टाग्राम चे थंबनेल पाच मिनिटात बदलून इंस्टाग्राम वर पाठवले.
नीरज ने शोधलेला बग दुरुस्ती करण्यात आला आणि इंस्टाग्राम ने नीरज च्या अहवालाला मंजुरी दिली. तसेच नीरजला सुमारे ३५ लाख रुपये बक्षीस देण्यात आले. यादरम्यान ४ महिने उशीर झाल्यामुळे नीरजला बोनस म्हणून ३ लाख रुपये जास्त देण्यात आले. नीरज शर्माने इंस्टाग्राम मधील बग शोधल्याने सामान्य युजर चे अकाउंट हॅक होण्यापासून वाचवले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे