पुणे, २१सप्टेंबर २०२२: पुण्यात चालणाऱ्या सर्वात जास्त गाड्या या सीएनजी वर आहेत. चारचाकी, रिक्षा आणि बस हे सर्व प्रवासी वाहतूक व चारचाकी खाजगी कंपनीत काम करण्यासाठी वापरतात. पण एक ऑक्टोबर रोजी सीएनजी पंप बंद असणार आहे. त्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
पेट्रोलियम मंत्र्यालयाने याबाबत एक पत्रक जारी केले आहे. पत्रकानुसार सीएनजीच्या ट्रेड डीलर मार्जिनमध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण पुण्यात जास्त करुन प्रवास हा रिक्षाने होत असल्याने पुणेकरांची गैरसोय होणार आहे.
पुणे शहरात साठ पेक्षा जास्त सीएनजी पंप आहेत. पण ऐक ऑक्टोबरला सीएनजीची विक्री होणार नाही याची माहिती समोर आली आहे. तसेच महापालिकेने सीएनजीवरील पीएमपीएल बसही आणलेल्या आहेत. त्यामुळे बस वाहतूकीवरही याचा परिणाम होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर