मुंबई, २४ सप्टेंबर २०२२ : बॉलीवू ड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्रा गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. मागच्या वर्षी पॉर्न व्हिडिओ प्रकरणामुळे राज कुंद्रा वादात सापडला होता. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासानंतर त्याला अटक देखील झाली होती. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. दरम्यान या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण होत असताना राज कुंद्रा ने सोशल मीडिया पोस्टद्वारे पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
राज कुंद्रा ने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘आर्थर रोड’ तुरुंगातून सुटका होऊन आज एक वर्ष झाले. ही फक्त काळाची गोष्ट आहे. न्याय नक्कीच मिळेल!सत्य लवकरच समोर येईल. मला माझ्या शुभचिंतकांचे आणि ट्रोल करणाऱ्यांचे आभार मानायचे आहेत त्यांनी मला मजबूत केले.
राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचन अश्लील चित्रफित बनवणे आणि त्यांच वितरण करणे या गुन्ह्याखाली अटक केली होती. याशिवाय त्यांच्यावर फसवणुकीचाही आरोप आहे. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी याबाबत कधीच काहीही बोलले नाही. पण आता वर्षभरानंतर त्यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे.
दरम्यान अशी बातमी समोर येत आहे की सलमान खानचा बिग बॉस सीजन १६ मध्ये तो दिसणार आहे आणि आपल्या आयुष्यविषयी कदाचित मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार राज आणि मेकर्स मध्ये सध्या शो विषयी चर्चा सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव