निर्णायक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून दणदणीत विजय

पुणे, २६ सप्टेंबर २०२२ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याच्या टी-ट्वेंटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णयक सामना रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. या अटीतटीच्या सामन्यात भारताने चार विकेट्स गमावून १८७ धावांचे लक्ष पूर्ण करून ऑस्ट्रेलिया विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-ट्वेंटी सामन्याची मालिका भारताने जिंकली.

या निर्णयाक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर एरोन फिंच व केमरुन ग्रीन यांनी संघाला आक्रमक सुरुवाती दिली. ग्रीन ने २१ चेंडूवर ५१ धावा काढल्या मात्र, त्यानंतर अक्षर पटेल पुढे ऑस्ट्रेलियाची मधील फळी ढेपाळली. अखेरीस टीम डेविड व डॅनियल सेम यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला १८६ पर्यंत मजल मारून दिली. टीम डेविड ने २७ चेंडूत २ चौकारांनी व ४ षटकारांसह ५४ धावा करत आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. तर ग्रीन ने २१ चेंडू ७ चौकाराने ३ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तर भारतीय संघाकडून अष्टपैलू अक्षर पटेल यांनी सर्वाधिक तीन बळी टिपले.

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना केएल राहुल पहिल्या षटकात बाद झाला. त्यानंतर गेल्या सामन्यातील भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा कर्णधार रोहित शर्माही केवळ सतरा धावा करून पॅट कमिन्स च्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे भारताची दोन बाद ३० अशी स्थिती झाली होती. त्यानंतर विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे अक्षरशः वाभाडे काढले. प्रत्येक षटकात चौकार -षटकार ठोकत त्यांनी दहा षटकात भारताला शंभरी पार नेले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाच्या अशा कायम ठेवल्या. सूर्यकुमार मोठा फटका मारण्याच्या नादात ६९ धावावर बाद झाला. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर विराटने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. याच दरम्यान त्यांनी आपले ३३वे टी ट्वेंटी अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी थोडीफार नियंत्रण गोलंदाजी केली. मात्र अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना विराटने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. मात्र पुढील चेंडूवर तो बाद झाला . त्याने ४८ चेंडूवर ६३ धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा