राजस्थान मध्ये शिंदे पॅटर्न; ९२ काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची हाक

राजस्थान, २६ सप्टेंबर २०२२ : राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकीसाठी अशोक गेहलोत यांनी आपले मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे स्पष्ट केल्याने अध्यक्ष पदाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये अशोक गेलोत त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री कोण असणार या विषयावर निर्णय घेण्यासाठी काल सायंकाळी जयपुर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. दरम्यान राजस्थान चे नवे मुख्यमंत्री होण्यास सचिन पायलट यांच्या नावाला अशोक गेहलोत समर्थक असलेल्या जवळपास ९२ आमदारांनी विरोध दर्शवत आपला राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.

त्यामुळे आता राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तर अशोक गेहलोत यांनी आपले मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी शिंदे पॅटर्न वापरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी मोर्चा बांधणी केली असून येथे १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. अशोक गेहलोत यांनी एक व्यक्ती एक पद बोलत मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा होती, मात्र गेहलोत आपले मुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी नवी खेळी खेळत असल्याचे समोर येत आहे. गेहलोत यांना समर्थन असणाऱ्या तब्बल ९२ आमदारांनी सचिन पायलट यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. तर विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देण्यासाठी गेले आहेत.

दरम्यान आत्ता राजस्थान काँग्रेस चा खेळ बिघडला आहे, त्यामुळे अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रासारखाच शिंदे पॅटर्न वापरत असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेस चा एक व्यक्ती एक पद या योजनेनुसार गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. पण गेहलोत यांना दोन्ही पदं पण आपल्याकडे पाहिजे, त्यामुळे हा सगळा राजकीय वाद सुरू झाला आहे. राजस्थानमध्ये ९२ आमदारांच्या राजीनामाची शस्त्रं पुढं करत गेहलोत त्यांची खेळलेली खेळी यशस्वी होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा