पुणे, २८ सप्टेंबर २०२२ : २२ सप्टेंबरपासून पीएफआय या संघटनेवर कारवाई व्हायला सुरुवात झाली. त्यातही खास करुन मुद्दाम पीएफआयला टारगेट केलं जात असल्याच्या बातम्या माध्यमांपर्यंत पोहोचल्या. मात्र यावर आता तपासणीमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
या संघटनेच्या कार्यालयातून IED अर्थात बॉम्ब तयार करण्याची साधन-सामुग्री मिळाली असल्याचं समजलं आहे. पीएफआयच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आल्यानंतर तामिळनाडू, केरळ, अनेक ठिकाणी प्रदर्शने करण्यात आली. देशाची, लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने पीएफआय या संघटनेची स्थापना करण्यात आली. पण वास्तव मात्र वेगळं आहे.
तामिळनाडूतल्या रामनाड जिल्ह्यातल्या पीएफआयच्या कार्यालयावर छापा घातल्यानंतर तिथल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयातून दोन LHR-80 जीपीएस, एक रेडिओ नेव्हिगेटर, ताब्यात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर IED तयार करण्याचे सामानही सापडले आहे. तसेच बॉम्ब तयार करण्याच्या शॉर्टकोर्सची पुस्तिकादेखील या छाप्यात मिळाली आहे. देशाला मुस्लिम कशाप्रकारे बनवण्याचे पूर्ण आखणीची अनेक पुस्तके या छाप्यातून सापडली. कोलकत्त्याच्या ऑफिसमधून अशी काही कागदपत्रे सापडली अहेत, ज्यात देशाविरोधी अनेक प्रकारच्या नोंदी आहेत.
पीएफआय संघटनेच्या भारतातल्या कार्यालयावर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र आता ही संघटना देशासाठी काम करत होती की देशाच्या विरोधात काम करत होती? असे अनेक प्रश्न त्यामुळे उपस्थित झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस