नाशिक,२९ सप्टेंबर २०२२: नाशिकच्या गंगापुर परिसरात एका चोरीची मोठी चर्चा सुरु आहे. एक बेरोजगार असलेल्या जावायाने सासूच्या घराची किल्ली चोरुन तब्बल साठेदहा लाखांचे दागिने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. सासू मिरा गंभिरे यांनी गंगापुर रोडवरील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आलोक दत्तात्रय सानप असे असून तो मखमलाबादरोड परिसरात राहणारा आहे. तर तकारदार सासू मिरा गंभिरे यांचा लेडीज पार्लरचा व्यवसाय आहे. त्यांच्या मुलीने आलोक सानप याच्यांशी प्रेमविवाह केला आहे. आलोक हा उच्चक्षिशीत असून तो बेरोजगार होता.
त्यामुळे त्यांचे सासरवाडीला नेहमी जाणेयेणे होत. या घरातील सर्व गोष्टीची माहिती त्याला होती. आणि एक दिवस संधी साधून घराची दुसरी चावी चोरली आणि साठेदहा लाखांचे दागिने चोरले व तेथून गायब झाला होता.पोलिसांनि चोवीस तासाच्या आत आरोपी आलोक सानप याला ताब्यात घेतले.
चौखशी दरम्यान आपणच रात्री सासूचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून पोलिसांनी साठेदहा लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर